Devotees bidding an emotional farewell to Pune’s five revered Ganpatis amid vibrant dhol-tasha beats. Saam Tv
Video

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Cultural Ganpati Procession In Pune: पुण्यातील दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज शनिवारी मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन भक्तिमय वातावरणात पार पडले. ढोल-ताशांच्या गजरात पुणेकरांनी आपल्या लाडक्या गणपतींना उत्स्फूर्त निरोप दिला.

Omkar Sonawane

पुण्यातील गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या उत्साहानंतर आज शनिवारी मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. ढोल-ताशांच्या गजरात पुणेकरांनी आपल्या लाडक्या गणपतींना भावपूर्ण निरोप दिला. मानाच्या पहिला कसबा गणपतीचे विसर्जन दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांनी पार पडले, तर दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी पार पडले.

तिसरा मानाचा गुरुची तालीम गणपती नटराज घाट येथे दुपारी ४ वाजून ३५ मिनिटांनी विसर्जित झाला. चौथा मानाचा तुळशीबाग गणपती पाचाळेश्वर घाट येथे संध्याकाळी ५ वाजता विसर्जन करण्यात आला, तर पाचवा केसरीवाडा गणपती कृत्रिम हौदात संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी विसर्जनासाठी सज्ज करण्यात आला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या विसर्जन सोहळ्यांत भाविकांनी ढोल-ताशांचा गजर करत गणपती बाप्पाला उत्स्फूर्त निरोप दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, बड्या नेत्यासह अनेक नगरसेवकांना फोडलं; लवकरच पक्षप्रवेश होणार

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मान

Chakolya Recipe : 'चकोल्या' ही रेसिपी कधी खाल्ली आहात का? फक्त खमंग वासानेच पोट भरेल

Shocking : ७ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नामांकित मॉलच्या बेसमेंटमध्ये आरोपीचं भयंकर कृत्य

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT