Pune Crime Gaurav Ahuja Saam Tv
Video

Gaurav Ahuja : भररस्त्यात नंगानाच करणाऱ्या गौरव आहुजाचा नवा व्हिडीओ समोर, थेट शिंदेंची मागितली माफी, पाहा VIDEO

Pune Crime Gaurav Ahuja : पुण्यातल्या शास्त्रीनगर सिग्नलजवळ लघुशंका आणि विकृत चाळे करणाऱ्या गौरव आहुजाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्याने केलेल्या कृत्यावरुन माफी मारत लवकरच सरेंडर करणार असल्याची माहिती दिली आहे.

Yash Shirke

Pune News : पुण्यातल्या येरवडा परिसरात शास्रीनगर सिग्नलजवळ गौरव आहुजा या तरुणाने लघुशंका केली होती. नागरिकांशी वाद घातल त्याने विकृत चाळे देखील केले. या प्रकरणी पोलिसांनी गौरवचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान त्याने केलेल्या कृताची व्हिडीओद्वारे माफी मागितली आहे.

'मी गौरव आहुजा, राहणार पुणे. माझ्याकडून रस्त्यात मध्ये जे कृत्य झालं होतं, ते खूप चुकीचं होतं. आणि मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता, पोलीस दल आणि शिंदे साहेबांची मी माफी मागतो. मला माफ करा. मला एक चान्स द्या. सॉरी. मी पुढच्या आठ तासात येरवडा पोलीस ठाण्यात हजर होणार आहे. प्लीज माझ्या फॅमिली मेंबरला त्रास देऊ नका', असे गौरवने व्हिडीओमध्ये म्हटले आहे. घटनेनंतर गौरव पुण्यातच लपून बसला होता असे म्हटले जात आहे. दरम्यान या प्रकरणातील दुसरा आरोपी म्हणजे गौरवचा मित्र भाग्येशला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लवकरच गौरवदेखील पोलिसांसमोर शरणागती पत्करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT