Pune Bailgada Sharyat Saam Tv
Video

Pune: बैलगाडा शर्यतीत अपघाताचा थरार, तरुण खाली पडला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Pune Bailgada Sharyat: पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यामध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये भयंकर घटना घडली. बैलगाडा शर्यतीच्या घाटामध्ये घोडीवरून तरुण खाली पडला. यावेळी बैलगाडा त्याच्या अंगावरून जाणार होता पण तो थोडक्यात बचावला.

Priya More

बैलगाडा शर्यतीच्या घाटात घोडेस्वाराचा थरकाप उडवणारा अपघात झाला. वाऱ्याच्या वेगाने धावणारा घोडेस्वार थेट धावत्या बैलगाड्याखाली आला अन देव तारी त्याला कोण मारी! ही म्हण सत्यात उतरली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात विठ्ठलवाडी येथे बैलगाडा शर्यतीत बैलगाडा घाटात धावत असताना घोडीवर स्वार झालेला अनिकेत चिखले हा युवक अचानक तोल जाऊन थेट घाटात कोसळला.

यावेळी वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या बैलगाड्याखाली अनिकेत आला. क्षणभर सर्वांना वाटले की, आता अनिकेत भरधाव वेगात येणाऱ्या बैलगाड्याखाली सापडणार मात्र पुढे जे घडलं ते चकित करणारं होतं. घाटात पडलेल्या अनिकेतला पाहताच भरधाव धावणाऱ्या बैलांच्या दोन्ही जोड्यांनी आणि गाडीनेही थेट उडी मारत त्याला स्पर्शही होऊ न देता पुढे धाव घेतली आणि मोठा अनर्थ टळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आज प्रचाराचा शेवटचा दिवस, मुख्यमंत्री दुचाकी चालवत करणार रोड शो

Haldi Kumkum gift ideas: यंदा संक्रांतीच्या हळदी-कुंकवासाठी काय वाण देणार? या आयडिया ठरतील बेस्ट ऑप्शन

Ladki Bahin Yojana: कोणत्याही क्षणी लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹३००० येणार? वाचा नवीन अपडेट

Cash For Votes : महापालिका निवडणुकीत मतांची किंमत 3 हजार, नेमकं कुठं कुठं पैसे वाटणाऱ्यांचा भंडाफोड

Success Story: आधी इंजिनियरिंग; १२ लाखांच्या पॅकेजची नोकरी सोडली अन् UPSC दिली; IPS सईम रजा यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT