Ajit Pawar plane crash report saam tv
Video

Ajit Pawar death: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतली अजित पवारांच्या विमान अपघाताची माहिती

Ajit Pawar plane crash report: महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अपघाताची माहिती घेतली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे आज बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने अपघाताची सविस्तर माहिती मागवली आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करत घटनेचा सविस्तर आढावा घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, "अजित पवार यांच्या निधनाने देशाने एक प्रशासकीय पकड असलेला नेता गमावला आहे." तर अमित शहा यांनी "ही राज्याची कधीही न भरून निघणारी हानी" असल्याचे म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune : धुकं, डोंगर अन् ३५० फूट उंच धबधबा! लोणावळ्याच्या कुशीत लपलेले 'हे' ठिकाण दिसते स्वर्गाहून सुंदर

Maharashtra News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

Famous Actor Death : तेजस्वी तारा काळाच्या पडद्याआड, प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; मनोरंजन विश्वात हळहळ

Monsoon Hair Fall: पावसाळ्यात केस गळतायत? हे तेल ठरेल रामबाण उपाय

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईसह ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT