अमोल मिटकरी यांनी स्वबळाची भाषा केली होती
VIDEO: Amol Mitkari यांच्या 'त्या' वक्तव्यावर Pravin Darekar यांचा जोरदार पलटवार  Saam TV
Video

VIDEO: Amol Mitkari यांच्या 'त्या' वक्तव्यावर Pravin Darekar यांचा जोरदार पलटवार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी स्वबळाची भाषा केली आहे. विधान सभा वेगळी लढू असं विधान अमोल मिटकरी यांनी केलं होतं त्यांच्या या विधानामुळे महायुतीत वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्येक पक्षाने १०० जागा लढवल्या तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, आम्हाला ५५ जागा मिळत असतील तर त्या आम्हाला मान्य नाही असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला होता त्यांच्या याच विधानावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार पलटवार केला आहे. अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे. अमोल मिटकरी यांना अधिकार दिला आहे का? ते ऑथॉरिटी आहे का? हे त्यांच्या नेत्यांनी जाहीर करावं असं दरेकर म्हणाले. त्यांच्या बोलण्याला अधिकृत समजावं असं मला वाटत नाही. अजित दादा जेव्हा भूमिका मांडतील तेव्हा त्या भूमिकेला महत्व येईल, अन्यथा अमोल मिटकरी यांच बोलणं हे बोलाची कढी आणि बोलाचा भात म्हणत दुर्लक्ष करणे याच्या पलीकडे भाग नाही असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी मिटकरींवर निशाणा साधला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde Video: महिलांकडे पैसे मागितल्यास कठोर कारवाई, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Leafy Vegetables Pakoda : पावसाळ्यात खा पालेभाज्यांचे भजी; वाचा रेसिपी

kangana Ranaut : कंगना रणौत यांना कानशिलात लगावणाऱ्या CISF महिला जवानाच्या अडचणीत भर; विभागाकडून मोठी कारवाई

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी सायबर कॅफे चालकांकडून लूट; जास्तीचे पैसे घेत असल्याचा आरोप

Prakash Mahajan: 'मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नको' महाजनांची मोठी मागणी!

SCROLL FOR NEXT