Prashant Kishor Latest News Saam TV Marathi
Video

मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीसाठी प्रशांत किशोर करणार काम

Prashant Kishor Latest News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मोठी रणनीती आखली. प्रशांत किशोर लवकरच पक्षाचे सल्लागार म्हणून काम सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Ganesh Kavade

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आगामी निवडणुकांसाठी मोठी तयारी सुरू केलीय. प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आता पक्षाचे सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत.यासंदर्भात सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची दोन तास चर्चा झालीय. 'डिझाइन बॉक्स'नंतर आता प्रशांत किशोर यांची कंपनी पक्षाची नवी रणनीती ठरवणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून डिझाईन बॉक्स नंतर लवकरच नव्या राजकीय रणनीती ठरवणाऱ्या संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे.

सोमवारी सकाळी २ तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची बैठक पार पडली. बैठकीचे सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर येत्या २ दिवसांत कायदेशीर बाबी पूर्ण करून लवकरच प्रशांत किशोर यांची कंपनी कामाला सुरुवात करणार आहे. १ जून पासून प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणनितीकार म्हणून काम पाहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार; 5 राशींच्या व्यक्तींचे अडथळे कायमचे दूर होणार, वाचा आजचे राशीभविष्य

Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; पर्यवेक्षिकेसाठी लागू असलेली वयाची अट रद्द

गरब्यासाठी भाड्यानं पार्टनर मिळणार?गरब्यासाठी मुलींची बोली, संभागी ब्रिगेड आक्रमक

Fact Check: गाड्यांवर लिंबू-मिरची लावल्यास दंड? गाडी मालकाला 5 हजारांचा दंड लागणार?

कागदावर केमिकल टाका, नोटा तयार करा? 500ची नोट तयार करणारं 'केमिकल रॅकेट'

SCROLL FOR NEXT