Bacchu Kadu Saam Tv
Video

शेतकरी प्रश्नावर बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक, मंत्रालयाबाहेर हायव्होलटेज ड्रामा,आंदोलक पोलिसांच्या ताब्यात|VIDEO

Prahar Sanghatana protest at Mantralaya : शेतकरी प्रश्नावर बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक झाली असल्याने मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेनं सरकारच्या विरोधात आज आंदोलन सुरू केलं आहे.

Omkar Sonawane

प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी विविध प्रश्नांसाठी उपोषनाच हत्यार उपसले आहे. आज या उपोषनाचा चौथा दिवस आहे. राज्यभरातील अनेक नेत्यांनी कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत बच्चू कडू यांनी उपोषण न सोडण्याचा निर्धार घेतल्याने प्रहार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेने मंत्रालयाबाहेर जोरदार आंदोलन सुरू केले असून पोलीस आणि या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट पाहायला मिळाली.

शेतकरी प्रश्नावर बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक झाली असल्याने मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेनं सरकारच्या विरोधात आज आंदोलन सुरू केलं आहे. अमरावतीत बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. सरकार दखल घेत नसल्याने कडूंचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी बच्चू कडूंच्या मागण्यांसाठी मंत्रालयाबाहेर आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बांगलादेशकडून कांदा आयातीवर निर्बंध, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

Success Story: कौतुकास्पद! IPS ट्रेनिंगदरम्यान झाले IAS; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; ऋत्विक वर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या आज आर्थिक समस्या सहज दूर होतील; जाणून घ्या राशीभविष्य

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT