eknath shinde and aditya thackrey  Saam Tv
Video

Maharshtra Politics: एकनाथ शिंदे आले, सगळे उठून उभे राहिले; मात्र, आदित्य ठाकरे बसूनच राहिले,VIDEO

Face-off in Assembly: शिवसेनेत पडलेल्या फूटीनंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे आमने सामने आले मात्र दोघांनीही एकमेकांकडे बघणे टाळले.

Omkar Sonawane

मुंबईतील रस्त्यांच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात सर्वपक्षीय आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे यांची देहबोली विशेष चर्चेचा विषय ठरली.

आज दुपारी 3.30 वाजता मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरणाच्या विषयावर ही बैठक झाली. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी बैठकीला जाणे टाळले, मात्र काही वेळाने ते उपस्थित झाले. त्यावेळी उपस्थित सर्व आमदार उठून उभे राहिले, मात्र आदित्य ठाकरे मात्र बसूनच राहिले. विशेष म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहण्यासही टाळले.

तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांनी आपली गट ही खरी शिवसेना असल्याचा दावा करत न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक चिन्ह देखील मिळवले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वेळोवेळी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरणाच्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे वारंवार करत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर, या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी काँक्रीटीकरणातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी केली.

ही बैठक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून, एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti Tips: 'या' 4 ठिकाणी दान केल्यास व्हाल मालामाल, चाणक्यांनी सांगितले झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग

Ladki Bahin Yojana: १२००० पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; २३ कोटी रुपये लाटले; धक्कादायक माहिती उघड

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला

Ranveer Singh : बॉलिवूडचा 'धुरंधर' झाला कास्टिंग काउचचा शिकार, किस्सा वाचून अंगावर येईल काटा; म्हणाला - 'प्रोड्यूसरने मला पार्टीला बोलावले अन्...'

Kidney Damage Habits : सावधान! दररोजच्या ५ चुका पडतील महागात, किडनी होईल फेल; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT