Varsha Gaikwad: मोदींनी माफी मागावी, अशी मागणी करणारे पोस्टर मुंबई युवक काँग्रेसने मुंबईभर लावले आहेत. सरकारला प्रश्न विचारणारे पोस्टर्स मुंबईभर लावले आहेत. मालवण मधील दुर्घटनेनंतर वर्षा गायकवाड यांनी पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केलीये. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांना सकाळी त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसने पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात आक्रमकपणे आंदोलन करण्याचा निर्णय केला आहे. पोलिसांनी गायकवाडांना रोखलंय तरीही मुंबई काँग्रेसची आक्रमकता कमी होताना दिसत नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.