Modi Vashim Daura Update SaamTv
Video

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

Vashim News : पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला वाशिम जिल्हा दौरा करणार होते. मात्र आता हा दौरा 5 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.

Saam Tv

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 26 सप्टेंबरला होणारा वाशिम दौरा आता पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा दौरा 5 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.

वाशिम येथे पंतप्रधान मोदी हे विकासकामांच्या लोकार्पणासाठी दौरा करणार होते. मात्र आता हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. 5 ऑक्टोबरला आता हा दौरा ठेवण्यात आला आहे. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवीला मोदी भेट देणार आहेत. पोहरादेवी इथे असलेल्या नंगारा वास्तु संग्रहालयाचं लोकार्पण यावेळी नरेंद्र मोदी करणार आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांनी ही माहिती दिली आहे. नंगारा वास्तु संग्रहालय बंजारा समाजाची संस्कृती देवाणघेवाण करण्यासाठी आणि बंजारा समाजाचा विकास म्हणून ओळखला जाणार आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातील काही महत्वाचे मंत्री उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT