क्वाड परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिरंगा स्टिकर उचलला
मोदींच्या तिरंग्याप्रती आदर दाखवणाऱ्या कृतीचा व्हिडिओ व्हायरल
क्वाड परिषदेत मोदींच्या व्हायरल व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा
फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे आयोजित 'क्वाड' (Quad) नेत्यांच्या शिखर परिषदेदरम्यानचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; या व्हिडिओतून राष्ट्रीय ध्वजाप्रती असलेला त्यांचा गाढ आदर पुन्हा एकदा दिसून येतो. 'आसियान' (ASEAN) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'क्वाड' नेत्यांच्या फोटो सत्रादरम्यान, पंतप्रधान मोदींनी खाली वाकून जमिनीवर पडलेले भारतीय तिरंग्याचे एक स्टिकर उचलले आणि ते आपल्या खिशात ठेवले.
क्वाड नेत्यांच्या या बैठकीत जी २०२४ नंतरची पहिलीच बैठक होती. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांच्यासोबत ग्रुप टीम पोज दिली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहून शकतो की, फोटो काढण्याच्या वेळी पंतप्रधान मोदी खाली वाकून कार्पेटवर चिकटलेले एक लहान, पांढऱ्या रंगाचे, कार्ड उचलतात आणि ते आपल्या खिशात ठेवतात. हे कार्ड खुणांपैकी किंवा नामफलकांपैकी एक होते, ज्यांचा उद्देश समूह फोटोसाठी नेत्यांनी नेमके कुठे उभे राहावे, हे दर्शवणे हा होता. मात्र या खुणेवर भारताचा राष्ट्रध्वज असल्याने, पंतप्रधान मोदींनी ती जमिनीवर, पायाखाली तशीच पडून न ठेवता, उचलून आपल्या खिशात ठेवला.
समूह छायाचित्र सत्रादरम्यान पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे भरभरून कौतुक केले. त्यांना "अत्यंत खंबीर व्यक्ती" असं म्हटलं. ट्रम्प म्हणाले, "पंतप्रधान मोदी अत्यंत खंबीर व्यक्ती आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.