पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत अमेरिकेच्या विरोधात एकही शब्द बोलले नाहीत, अशी टीका काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केली आहे. मोदी १०० टक्के ट्रम्प यांच्या कंट्रोलमध्ये असल्याचा दावाही त्यांनी केला.
पंतप्रधान मोदींनी संसदेत २५ मिनिटं भाषण केलं. अमेरिकेविरोधात काही बोलले का? चकार शब्दही काढले का? शतप्रतिशत कंट्रोलमध्ये आहेत, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर निशाणा साधला. भारत सरकारने पहिल्यांदा अमेरिकी उत्पादनांसाठी कृषी क्षेत्र खुलं केलं, असा आरोपही त्यांनी केला. गुजरातमधील आदिवासी अधिकार संविधान संमेलनात ते बोलत होते.
ट्रेड डीलवरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा साधला. मोदींनी व्यापार करार करून भारताचं कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी खुलं केलं. आपल्याकडे लहान शेत आहेत. तर अमेरिकेत मोठमोठे शेत असतात. आपल्याकडे शेतकरी बऱ्याचदा हाताने काम करतात. तिकडे मोठमोठ्या मशीन असतात. जर अमेरिकेचा माल भारतात यायला लागला तर, आपले शेतकरी उद्ध्वस्त होतील. त्यामुळे कोणत्याच पंतप्रधानांनी अमेरिकेसाठी कृषी क्षेत्र खुलं केलं नव्हतं, असं राहुल गांधी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.