parbhani crime  Saam tv
Video

Parbhani Crime : महाराष्ट्राला हादरला; वंशाच्या दिव्यासाठी पत्नीला जाळलं,VIDEO

Parbhani Crime News : परभणीत पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी घटना घडली. भररस्त्यात पतीनं पत्नीला आगीच्या स्वाधीन केलं नेमकं असं काय घडलं पती पत्नी मध्ये पाहुया या रिपोर्टमध्ये..

Snehil Shivaji

हा आगीचा गोळा नीट पहा, हा नुसता आगीचा गोळा नसून ही आगीनं वेढलेली ३ मुलींची आई आहे. होय तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरंय. एका ३ मुलींच्या आईला तिच्याच पतीनं तिसरीही मुलगी झाली म्हणून अंगावर पेट्रोल ओतून भर रस्त्यात पेटवून दिलं. अंगावर शहारे आणणारी ही घटना पुरोगामी म्हणणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील परभणीमध्ये घडली.

केवळ मुलाच्या अट्टासापायी कुंडलिक काळेंना मुलींच्या देखत त्यांच्या आईला पेटवून दिलं. मदतीसाठी मैना काळे यांनी केलेली याचना सीसीटिव्हीतही कैद झाली. पण आगीनं रौद्ररुप धारण करत दुकान आणि घरालाही वेढलं. पण मदतीचे सगळे प्रयत्न फोल ठरले. उपचारा दरम्यान या महिलेचं निधन झालं आणि ३ मुली एका क्षणात पोरक्या झाल्या. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी कुंडलिक काळेवर गुन्हा दाखल केलाय. मात्र मुलगा व्हावा यासाठी पुरोगामी महाराष्ट्रात आणखी किती पणत्या विझणार? हा महत्वाचा प्रश्न आहे... त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी सामाजिक प्रबोधनाची नितांत गरज असल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT