ST bus washed away in flood waters Saam TV
Video

Marathwada Rain : परभणीत पुराच्या पाण्यात एसटी बस गेली वाहून, धडकी भरवणारा VIDEO समोर

Parbhani Heavy Rain Video : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. एसटी महामंडळाची बस पुराच्या पाण्यात वाहून गेली. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आलाय.

Satish Daud

राजेश काटकर, साम टीव्ही परभणी

परभणी : गेल्या 24 तासांपासून परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मानवत तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एसटी महामंडळाची बस पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या मानवत तालुक्यातील वझुर (बु.) येथे सोमवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. वझुर गावात पाथरी आगाराची बस मुक्कामी होती. बसमध्ये चालक सुदाम दहे आणि वाहक शिवाजी देशमुख झोपलेले होते. बसमध्ये पाणी शिरल्याचा आवाज येत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बस चालू करण्याचा प्रयत्न केला.

परंतु बसला चालू होऊन ब्रेकच्या हवेची टाकी भरण्यास वेळ लागला. तोपर्यन्त एक मोठा पाण्याचा लोंढा आला आणि बसने जागा सोडून वाहू लागली. प्रसंगावधान राखून चालक व वाहक यांनी वाहनातून काढता पाय घेतला आणि जीव वाचवला. दोघेही वेळीच बसमधून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, बस 100 मीटर पेक्षा दूर पुराच्या पाण्यात वाहून गेली आणि तिथेच अडकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT