Madhya Pradesh Saam TV
Video

Madhya Pradesh : खदाणीत सापडला अमूल्य हिरा; हिऱ्याची किंमत ऐकून व्हाल थक्क, पाहा VIDEO

Panna Diamond : एक सर्वसामान्य कामगार जेव्हा खदाणीत काम करत असतो, तेव्हा त्याला काय सापडेल याची कल्पना नसते. मात्र या वेळी नशीब फळालं आणि त्या मजुराच्या हातात सापडला अमूल्य हिरा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एक सर्वसामान्य कामगार जेव्हा खदाणीत काम करत असतो, तेव्हा त्याला काय सापडेल याची कल्पना नसते. दैनंदिन मजुरीसाठी खदाणीत राबणाऱ्या या कामगाराच्या हाताला असा काही हिरा लागला की, क्षणात त्याचं नशीबच पालटलं आहे. या हिऱ्याची अंदाजे किंमत तब्बल ४० लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.पन्ना जिल्ह्यातील एका खाणीमध्ये काम करत असताना या मजुराला जमिनीखालून झळाळता अमूल्य हिरा सापडला आहे.

सुरुवातीला हा सामान्य दगड वाटावा, असाच तो वाटत होता. मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्याची गुणवत्ता आणि किंमत उघडकीस आली.हिरा मिळाल्यानंतर संबंधित मजुराने तो स्थानिक प्रशासनाकडे जमा केला असून, अधिकृत लिलावानंतर त्याला त्याचा हक्काचा हिस्सा दिला जाणार आहे.

एक दिवसाच्या मेहनतीनं त्याला आयुष्यभर पुरेल इतका मोबदला मिळणार आहे.पन्ना खदाणी हे आधीपासूनच मौल्यवान हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहेत, मात्र अशा प्रकारे अचानक अमूल्य हिरा सापडणं ही निश्चितच दुर्मिळ घटना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Maharashtra Fort : ५,१४१ फूट उंचीवर दिमाखात उभा आहे किल्ला, २-३ तासांचा थरार ट्रेक करून गाठता येतो माथा

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

SCROLL FOR NEXT