तब्बल अडीच महिन्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आज मंदिर समिती सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे 15 मार्चपासून ते संवर्धन आणि शिशुभकरणाच्या कामासाठी विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते. मंदिराचे जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले आहे उर्वरित 30 टक्के कामासाठी ही अवधी लागणार आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यातील काम पूर्ण झाले आहे त्यानंतर येत्या दोन जून पासून पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान आषाढी यात्रेच्या निमित्ताने 7 जुलै पासून देवाचे 24 तास दर्शन सुरू राहणार आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.