Pandharpur  SAAM TV
Video

Pandharpur : विठ्ठल रूक्मिणी मंदिर‌‌‌ कर्मचाऱ्यांना चिकन मसाला वाटप करणे चुकीचे; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची नाराजी | VIDEO

Vitthal Rukmini Temple : पंढरपुरात विठ्ठल मंदिरातल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला दिला आहे. बीव्हीजी कंपनीने ही भेट दिली आहे. या घटनेवर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातील कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून चिकन मसाल्याचे वाटप करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या घटनेवर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, धार्मिक ठिकाणी अशा वस्तूंचे वाटप करणे अनुचित असल्याचे स्पष्ट केले आहे. पालकमंत्र्यांच्या नाराजीनंतर बीव्हीजी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या चिकन मसाल्यासह भेटवस्तूंचे वाटप तात्काळ थांबवण्यात आले आहे. या प्रकारावर समाजातील विविध स्तरांतूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दरम्यान, मंदिर समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत बीव्हीजी कंपनीला नोटीस बजावली असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

SCROLL FOR NEXT