Firefighters battle massive blaze at Suryanagar Ashram School hostel in Palghar as over 200 students are evacuated safely. Saam Tv
Video

२०० विद्यार्थिनींचं हॉस्टेल आगीच्या भक्षस्थानी; शैक्षणिक साहित्य, कपडे जळून खाक, पाहा VIDEO

Palghar Tribal Ashram School Hostel: पालघरमधील कांदरवाडी येथील सूर्यानगर आश्रम शाळेच्या वस्तीगृहाला भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून 200 हून अधिक विद्यार्थी सुरक्षित आहेत.

Omkar Sonawane

पालघर: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कांदरवाडी येथील सूर्यानगर आश्रम शाळेच्या वस्तीगृहाला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीमध्ये वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचे कपडे, शैक्षणिक साहित्य, गाद्या तसेच इतर दैनंदिन वापराच्या वस्तू जळून खाक झाल्या. या वस्तीगृहात 200 पेक्षा अधिक विद्यार्थी वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.

सुदैवाने ही दुर्घटना वेळेत लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. विद्यार्थ्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात मदत करत बचावकार्याला हातभार लावला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आगीमागील नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री स्थापन करणार नवा पक्ष; राजकारणात खळबळ

महाराष्ट्रात आणखी एक उष्मघाताचा बळी; काही जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार

खरातच्या ट्रस्ट उपाध्यक्षाचा घात? शेळकेंच्या अपघाताच्या चौकशीची मागणी, खरातच्या ट्रस्टींवर कारवाई का नाही?

नाशिकमध्ये आता धर्मांतराचं 'गजवा-ए-हिंद' ब्लॅकमेलिंगचा 'लव्ह बाईट' पॅटर्न

डोंबिवलीत अधिकार्‍याला बांबूने मारहाण, फेरीवाल्याच्या हल्ल्यानंतर KDMCकडून मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT