Nitin Gadkari Saam Tv
Video

Maharashtra Politics : मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, नितीन गडकरींचा रोख कोणाकडे? पाहा VIDEO

Opposition Leader Give Offer To PM Post Nitin Gadkari : विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचं समोर आलंय. तुम्ही जर पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हाल, तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ अशी ऑफर विरोधकांनी दिल्याचा धक्कादायक खुलासा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय. कोणाचंही नाव घेता, गडकरी यांनी हे वक्तव्य केलंय. ते काल नागपूरमधील प्रेस क्लब येथे आयोजित केलेल्या एका पुरस्कार वितरण कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले की, त्या व्यक्तीला पाठिंबा का देता? असा सवाल त्यांना केला गेला होता. यावर गडकरींनी मी तुमचा पाठिंबा का घेऊ? असा प्रश्न केला. पंतप्रधान बनणं, हे माझ्या आयुष्याचे उद्दिष्ट नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याचं म्हटलंय. तर कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही. एकनिष्ठपणा महत्वाचा असल्याचं गडकरी म्हणाले आहेत. लोकशाहीमध्ये चारही स्तंभ योग्य पद्धतीने चालल्यास लोकतंत्र यशस्वी होईल, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT