Students allegedly involved in mass cheating during the Class 12 English exam as captured on CCTV at an examination center in Chhatrapati Sambhajinagar. Saam Tv
Video

CCTV समोरच बारावीच्या परीक्षेत खुलेआम शिक्षकांच्या सहाय्याने सामूहिक कॉपी, पाहा VIDEO

Hsc-Exam Scam Cctv Copying Maharashtra: छत्रपती संभाजीनगरमध्ये बारावीच्या इंग्रजी पेपरदरम्यान खुलेआम सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला आहे. सीसीटीव्ही समोरच विद्यार्थ्यांसह शिक्षक सहभागी असल्याचा धक्कादायक खुलासा झाला असून १९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

बारावीच्या पहिल्याच इंग्रजी पेपरला बोर्डानं लावलेल्या सीसीटीव्ही समोर बसूनच सामूहिक कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलाय. परीक्षेला बसले विद्यार्थीच कॉपी करत होते असं नाही तर त्या सामूहिक कॉपीमध्ये त्या परीक्षा केंद्रावरचे केंद्रप्रमुख शिक्षक आणि कर्मचारी सहभागी होते, हे त्यापेक्षा अधिक धक्कादायक. याप्रकरणी आता बोर्ड आणि शिक्षण विभागाने कठोर कारवाई सुरू केली.

बारावीच्या पहिल्याच पेपरला परीक्षा केंद्रावरच्या सीसीटीव्हीसमोरच खुलेआम सामूहिक कॉपी सुरू होती, तीही चक्क शिक्षकांच्या सोबतीने. हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलाय. याप्रकरणी १९ कर्मचाऱ्यांवर देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तर तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी त्या केंद्रातील सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत. कास्टेडियन मार्फत या उत्तरपत्रिका मागवण्यात येणार असून त्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर करवाई करण्यात येणार आहे. असे शिक्षणअधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT