Laxman Hake Vs Manoj Jarange Patil Saam Tv
Video

VIDEO: राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारे तुम्ही कोण? लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना थेट सवाल

Laxman Hake Vs Manoj Jarange Patil: जालन्याच्या वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे. यातच आज त्यांनी लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू, या आपल्या मागणीसाठी लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहेत. यातच आज पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले आहेत की, ''आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री हे मराठेच आहेत. ओबीसीला 1 टक्का बजेट तुम्ही देत नाही. जरांगे म्हणतात, ओबीसीने ७० वर्ष आरक्षण खाल्लं. मात्र खरं तर २८ वर्ष झाली, ओबीसींना आरक्षण कांद्याने मिळालं आहे. ओबीसींनी जर आरक्षण खाल्लं असतं, तर आज ओबीसींचे ४०० कारखाने दिसले असते. महाराष्ट्रात दोनशे साखर कारखाने आहेत. १०० खासगी आणि १०० सरकारी. यामध्ये १० ते १५ कारखाने सोडले, तर ९० टक्के कारखाने फक्त मराठा समाजाचे आहेत.''

मनोज जरांगे पाटील म्हणाले होते की, मराठा आणि ओबीसी समाजात काडी खऱ्या अर्थाने छगन भुजबळ यांनी लावली आहे. त्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. यावर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाल की, ''राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्यास जनता तयार आहे ना? तुम्ही कोण आहे राजकीय राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारे?''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपके पुन्हा दिल्लीमधील आंदोलनात सहभागी होणार

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

OTT Releases : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? नव्या चित्रपटांसह वेब सीरिज अन् रिॲलिटी शोची मेजवानी!

धक्कादायक! मेट्रोमध्ये फक्त सीटवरून वाद, तरूणाचा करुण अंत; आरोपीचं हायप्रोफाईल कनेक्शन समोर

SCROLL FOR NEXT