Laxman Hake News SaamTv
Video

Laxman Hake : जरांगेंच्या भूमिकेचं बारामती कनेक्शन? लक्ष्मण हाकेंचं मोठं विधान, पाहा Video

Laxman Hake Statement On Manoj Jarange : विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून मनोज जरांगे यांनी माघार घेतल्यानंतर ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जरांगे यांच्या भूमिकेवर त्यांनी टीका केली आहे.

Saam Tv

मनोज जरांगे पाटील हे केवळ बारामतीच्या स्क्रिप्टनुसार वागतात. ते निवडणूक लढणार नाही, हे मी सुरुवातीपासून सांगत आहे, अशी टीका ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली आहे. आज मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतल्या नंतर हाके यांनी याबद्दल प्रतिक्रिया देत जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली.

पुढे बोलताना हाके म्हणाले की, 'मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक दिवसाला भूमिका बदलणारा व्यक्ती आहे. मुंबईच्या वेशीवरून देखील ते माघारी फिरले होते. त्यांचा राजकारण आणि निवडणुकीबद्दल अजिबात अभ्यास नाही. जरांगे पाटील हे या आधी 130 उमेदवारांना पाडायची भाषा करत होते, त्याचे काय झाले? निवडणुकीच्या रिंगणातून त्यांनी पळ काढला आहे. ते केवळ बारामतीच्या सांगण्यावरुनच भूमिका घेतात', असा आरोप देखील हाके यांनी केला आहे. रणांगणात लढायला वाघाचे काळीज लागते. गनिमी कावा करण्याचा काळ आता गेला, असा टोलाही देखील त्यांनी जरांगे पाटील यांनी लगावला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT