Congress leader Vijay Wadettiwar addresses the media on the potential alliance of Uddhav and Raj Thackeray. Saam Tv
Video

अजूनपर्यंत कोणताही प्रस्ताव नाही; ठाकरे बंधूंच्या आघाडीवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया|VIDEO

Vijay Wadettiwar Remarks On Thackeray Brothers: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून काँग्रेसला अद्याप कोणताही आघाडीचा प्रस्ताव आलेला नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. प्रस्ताव आल्यास वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

Omkar Sonawane

काँग्रेस नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य आघाडीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधूंकडून आघाडीबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. उद्धवजी आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येऊन लढत असतील आणि त्यांनी आघाडीबाबत काही प्रस्ताव दिला, तर आम्ही स्थानिक स्तरावर त्याविषयी चर्चा करू. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे वडेट्टीवार म्हणाले. प्रस्ताव आल्यास काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यावर चर्चा करून पुढील धोरण ठरवतील, असेही त्यांनी नमूद केले. सध्या ना उद्धव ठाकरे यांच्याकडून, ना राज ठाकरे यांच्याकडून कोणताही आघाडीचा प्रस्ताव आलेला नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मीरा-भाईंदरमधील काशिमीरा परिसरात मध्यरात्री तरुणांचा दारू पिऊन धिंगाणा

वाघाचा बाईकस्वारावर हल्ला? शेपटीवरून बाईक नेणं पडलं महागात?

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! कधीपासून लागू होणार आठवा वेतन आयोग? सरकारनं दिली नेमकी माहिती

महाराष्ट्राला विरोधी पक्षनेताच नाही, विरोधी पक्षनेतेपदाविनाच चालणार अधिवेशन?

फुगा फुटला, जीव गेला, मुलांच्या हातात फुगा बॉम्ब

SCROLL FOR NEXT