Nitin Gadkari Saam Tv
Video

Nitin Gadkari: 'लाडकी'चा भरोसा नाय! गडकरींच्या विधानानं सरकारची कोंडी

Ladki Bahin Yojana: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात अमेझिंग विदर्भ कार्यक्रमात उद्योजकांशी बोलत होते. या कार्यक्रमात गडकरींनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं त्यामुळे सरकारची कोंडी झालीच तर दुसरीकडे विरोधकांना आयतं कोलीत मिळालंय.

Tanmay Tillu

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना आणली. मात्र आता या योजनेवर विरोधकांसोबतच भाजप नेत्यांनीही राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय.

या योजनेवर दुसरे तिसरे कुणी नाही तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच निशाणा साधलाय. लाडकी बहीण योजनेमुळे इतर विभागांमधल्या अनुदानाला कात्री लागल्याचं विधान गडकरींनी केलंय. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढलीय.

लाडकीवरून गडकरींनी केलेल्या विधानामुळे विरोधकांच्या आरोपांना आणखीनच धार आलीय. सरकारमध्ये लाडकीवरून नेमकं काय सुरू आहे हे गडकरींनाच माहित असेल त्यामुळे त्यांनी सुप्रिया सुळेंना सरकारवर निशाणा साधलाय. तर राऊतांनीही या योजनेत गौडबंगाल असल्याचं हल्ला केलाय.

राज्यावर 7 लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. त्यातच लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था आणखी खोलात जाईल, अशी टीका विरोधी पक्ष वारंवार करत असताना गडकरींसारख्या बड्या नेत्यानं सरकारलाच घरचा आहेर दिल्यानं सरकारची अडचण झालीये. त्यामुळे लाडकीचा नकारात्मक नरेटीव्ह महायुती खोडून काढण्यात यशस्वी होणार का? आणि याचा निवडणुकीत किती फायदा होणार? हे निकालांनंतरच स्पष्ट होणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT