Vaishnavi Hagawane Death Case  Saam tv
Video

Vaishnavi Hagawane : निलेश चव्हाणच्या घरातून पोलिसांना मोठा पुरावा मिळाला, हगवणेंच्या अडचणी वाढल्या

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाणच्या पुणे कर्वेनगर येथील घरातून तीन मोबाईल आणि एक बंदूक जप्त, पोलिस तपासात मोठा पुरावा समोर, हगवणे कुटुंबाची अडचण वाढली.

Namdeo Kumbhar

Pune Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याच्या घरातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी तीन मोबाईल फोन आणि एक बंदूक असा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या मोबाईलमध्ये करिष्मा आणि लता हगवणे यांचा मोबाईलचा देखील समावेश आहे. ज्या बंदुकीच्या जोरावर निलेश चव्हाण यांनी वैष्णवीच्या नातेवाईकांना हुसकावून लावलं होत. ती बंदूक देखील पोलिसांनी जप्त केली आहे. निलेश चव्हाण याला अटक केल्यानंतर शनिवारी बावधन पोलिसांनी त्याच्या पुण्यातील कर्वेनगर येथील घराची झळती घेतली होती, त्यावेळी पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे.

निलेश चव्हाण याला पोलिसांनी नेपाळमधून बेड्या ठोकल्या. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात राज्यातून संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणचा कसून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत हगवणे कुटुंबातील सदस्यासह निलेश चव्हाण या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. निलेश चव्हाण याने हगवणे यांना मदत केल्याचे तपासातून दिसून आलेय. निलेश चव्हाण याच्या गरातून पोलिसांना तीन मोबाईल आणि बंदूक मिळाली आहे. त्यामुळे आता हगवणेचे पाय खोलात गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विरारमध्ये डंपर खाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT