NEET 2025 biometric server saam tv
Video

Neet Exam: नाशिकच्या नीट परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक ठप्प, प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर, पाहा व्हिडिओ

Server Crash at Nashik: मेडिकल अभ्यासक्रमासाठी देशभरात होणारी NEET परीक्षा आज पार पडली, मात्र यावेळी काही ठिकाणी महाविद्यालय प्रशासनाचा भोंगळ कारभार पाहायला मिळाला.

Omkar Sonawane

नाशिकमधील मराठा हायस्कूल येथील नीट परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक तपासणीस विलंब झाल्याचे निदर्शनास आले. बायोमेट्रिक प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे अनेक विद्यार्थी जवळपास एक तास रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बायोमेट्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात होता.

मात्र, बायोमेट्रिक प्रणालीचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. काही विद्यार्थ्यांनी बायोमेट्रिक न झाल्यास परीक्षेला मुकावे लागेल, अशी भीतीही व्यक्त केली. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी करूनच त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला गेला.

हातातील दोरे, पाण्याच्या बाटल्यांवरील स्टिकर तसेच पायातील चप्पल काढूनच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आत पाठवले जात होते. तसेच, उष्णतेपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी प्राथमिक उपचाराची साधने परीक्षा केंद्रावर उपलब्ध ठेवण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

EPFO : मालक PF कापतो का? 2 मिनिटांत तपासा, वाचा सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT