Sharad Pawar Candidate List SaamTv
Video

Sharad Pawar : शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; 'या' 9 उमेदवारांना मिळणार संधी | Video

Rashtrawadi Sharad Pawar Group 3rd Candidate List Declared : मविआमधील शरद पवार गटाच्या तिसऱ्या यादीची आज घोषणा करण्यात आली आहे. यात बीड, परळीसह 9 उमेदवारांची नावं आहेत.

Saam Tv

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाची तिसरी यादी आज जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन यादीची घोषणा केली. यात एकूण 9 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. तिसऱ्या यादीत बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि परळी विधानसभा उमेदवारांचा समावेश आहे. यावेळी पवारांच्या राष्ट्रवादीने मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात परळीतून राजेसाहेब देशमुख यांना उतरवले आहे. तर माजलगावमध्ये अजित पवार यांच्या आमदार प्रकाश सोळंके यांना मोहन जगताप टक्कर देणार आहेत. तर अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्या पतीला तिकीट दिले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी

 १. करंजा - ज्ञायक पटणी

2. हिंगणघाट - अतुल वांदिले

3. हिंगणा - रमेश बंग

4. अणुशक्तीनगर - फहाद अहमद

5. चिंचवड - राहुल कलाटे

6. भोसरी - अजित गव्हाणे

7. माझलगाव - मोहन बाजीराव जगताप

8. परळी - राजेसाहेब देशमुख

9. मोहोळ - सिद्धी रमेश कदम

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुजरातमधील उधना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तुफान गर्दी, 24 तासांपासून नागरिक रांगेत उभे

Vijay Thalapathy: सुपरस्टार विजयची राजकारणात धमाकेदार एण्ट्री; नागरिकांना घातली भावनिक साद, सभेची गर्दी पाहून व्हाल अवाक्

Maharashtra Politics: 90 90 90 नाही, आमची यादी जिंकण्यासाठी आहे, भाजप अध्यक्षांचा मविआला टोला

Bandra Terminus: वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासनाला जाग; प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीबाबत घेतला मोठा निर्णय

Camphor Oil Benefits: केसांसह अनेक समस्यांवर कापूरचे तेल ठरते रामबाण

SCROLL FOR NEXT