Bapu Bhegade SaamTv
Video

Bapu Bhegade : मावळमध्ये महायुतीला धक्का; बापू भेगडेंचा अजित पवार गटाला राम-राम, अपक्ष निवडणूक लढवणार

Maval Constituency News : बापू भेगडे यांनी पदाचा राजीनामा अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवार यांना मावळ विधानसभेतून हा धक्का बसला आहे.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवार यांना मावळ विधानसभा मतदारसंघातून मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बापू भेगडे यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. त्यांच्या या बंडखोरीने महायुतीलला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता विधानसभेत मावळ विधानसभा मतदारसंघात आमदार सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत पाहायला मिळणार आहे.

महायुतीमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू होती. अखेर आज विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्याच पक्षातील बापू भेगडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापनेपासून सदस्य आहे. मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मी तयार झालो. माझं कुटुंब एकनिष्ठ काम करत राहिलं. परंतु, मला अजित पवारांनी मावळ मधून उमेदवारी दिली नाही. विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मला खूप दुःख झालं अशी खदखद बापू भेगडे यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीला राम- राम ठोकला आहे. त्यामुळे मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत होणार आहे निश्चित.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Eating Benefits: धावपळीच्या जगात तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Ajit Pawar vs Yugendra Pawar : शरद पवार यांचा 'नवा गडी, नवा डाव'; बारामतीत अजित पवारांविरोधात उमेदवार कसा ठरला?

Maharashtra Assembly Election : बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार; कुणाला मिळाली उमेदवारी? शरद पवार गटाची पहिली यादी वाचा एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे यांचे ६ वर्षांसाठी निलंबन

Manoj Jarange Death Threat : मनोज जरांगेंना अज्ञाताकडून धमकी, बैठकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ; VIDEO

SCROLL FOR NEXT