Ajit Pawar SaamTv
Video

VIDEO : 'कार्यकर्त्यांना चित्र स्पष्ट दिसलं तरच.. '; जागावाटपावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar News : महायुतीतील जागावाटपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी महायुतीतील जागावाटपाचं सूत्र सांगितलं.

Saam Tv

आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना ठराविक काळात जागा वाटपाचा तिढा सोडवावा लागणार आहे. यामध्ये फार लांबवले तर कार्यकर्ते संभ्रमात राहतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना चित्र स्पष्ट दिसलं पाहिजे. त्यानंतर ते आणखी जोमाने कामाला लागतात, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं आहे. मंगळवारी प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघात उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. आघाडी किंवा युतीमध्ये प्रत्येक पक्षाला देखील मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे. मात्र, सर्वांना शंभर टक्के मनासारख्या गोष्टी घडत नसतात. प्रत्येकाला दोन पावले पुढे किंवा मागे सरकावे लागतं. त्यातून थोडासा विलंब लागतो, असं म्हणत अजित पवार यांनी जागा वाटपावर प्रतिक्रिया दिली. एकाच पक्षाने सर्व जागा लढवण्याचं ठरवल्यावर असं काही होत नाही. मात्र युती किंवा आघाडी जाहीर झाल्यानंतर असं घडतं. हे आजच घडत आहे असं नाही, असंही अजित पवार यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी पकडलेल्या 5 कोटी रुपयांवर प्रतिक्रिया देताना 'जे पैसे सापडले, त्या पैशांची चौकशी करा, त्यातून दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल. चौकशीनंतरच त्याविषयी बोलायला हवं, काहीजण बिन बुडाचे आरोप करतात, असा पलटवार देखील अजित पवार यांनी केला आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT