Navnath Waghmare latest news from Beed Maharashtra saam tv
Video

मराठा समाजातील मुलींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारेंची मिरवणूक, VIDEO

Navnath Waghmare In Beed : मराठा समाजातील मुलींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे, बीडच्या गेवराईत वाघमारेंची मिरवणूक काढण्यात आली.

Nandkumar Joshi

योगेश काशिद , बीड | साम टीव्ही

Navnath Waghmare latest news from Beed Maharashtra : मराठा समाजातील मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. असं असताना बीडच्या गेवराईमध्ये एका कार्यक्रमानिमित्त मिरवणूक काढण्याता आली. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

यावर मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वाघमारे यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून, कारवाई न झाल्यास मराठा स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा त्यांनी दिला.

मराठा मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील महिला आणि मुलींच्या भावना दुखावलेल्या आहेत. नवनाथ वाघमारेंवर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून, त्याला पोलिसांनी अटक करणं गरजेचं होतं; मात्र तो फिरतोय. त्याला बीडमध्ये आणि महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत का? असा सवालही काळकुटे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT