Turbhe ST Depot Fire Saam TV
Video

Navi Mumbai : नवी मुंबईतील बस आगारात भीषण आग; नेमकं काय घडलं? | VIDEO

Turbhe ST Depot Fire News: नवी मुंबईतील तुर्भे परिसरात असलेल्या एसटीच्या बंद आगारात रविवारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबईतील तुर्भे परिसरात असलेल्या एसटीच्या बंद आगारात रविवारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या आगारात ट्रक, कार आणि इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात पार्किंग होती. त्यामुळे अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आग लागल्यानंतर काही स्फोटही झाल्याचे सांगण्यात येत असून त्याचा जोर इतका होता की आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्या हादरल्या गेल्या.

घटनेची माहिती मिळताच वाशी, नेरूळ आणि ऐरोली येथून अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन जवान युद्धपातळीवर प्रयत्न करत होते.सध्या आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेलं नसून शॉर्ट सर्किट किंवा इंधन गळतीमुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT