Navab Malik News SaamTv
Video

Navab Malik News : 'अजितदादांनीच मला घड्याळ चिन्हावर लढण्यास सांगितलं', प्रचारापूर्वी नवाब मलिकांनी दिली प्रतिक्रिया

Mankhurd-Shivajinagar News : मानखुर्द-शिवाजीनगरमधून विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्या गटाबद्दल माध्यमांना मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

'अजितदादांनीच मला घड्याळ चिन्हावर विधानसभा निवडणूक लढायला सांगितलं होतं', असं मोठं विधान नवाब मलिक यांनी केलं आहे. त्याचबरोबर पक्ष ही कोणाचीही प्रॉपर्टी नसते, पक्ष आणि चिन्हाबाबत कोर्टानेच अजित पवार यांच्या बाजूने निर्णय दिला आहे, असं देखील मलिक यांनी म्हंटलं आहे.

मानखुर्द-शिवाजीनगरमधून नवाब मलिक हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र या ठिकाणी महायुतीने शिंदे सेनेचा उमेदवार दिल्याने नवाब मलिक यांचा पत्ता कट झाला. त्यानंतर नवाब मलिक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यांचा पाठिंबा अजित पवार यांनाच असणार आहे. आज नवाब मलिक यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ' मी आजपासून प्रचाराला सुरुवात करतो आहे. मला पक्षाकडून विचारणा झाली होती पण मी कोणालाही येऊ नका, असं सांगितल. मला देखील इतर ठिकाणी बोलवलं आहे पण मी माझ्या मतदारसंघातच प्रचार करणार आहे. अजित पवारांनी स्वत: मला घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगितले होते', असं त्यांनी म्हंटलं आहे. तर पक्ष कोणाचीही प्रोपर्टी नसते. सध्या प्रकरण कोर्टात असून अजित पवारांच्या बाजून निर्णय दिला असल्याची प्रतिक्रिया देखील नवाब मलिकांनी दिली.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड

Health Care : जास्त प्रमाणात खजूर खाल्याने आरोग्यावर होतात 'हे' 5 गंभीर परिणाम; जाणून घ्या

Inhaled insulin: डायबेटीजग्रस्तांची इन्सुलिनच्या इंजेक्शनची कटकट संपणार; आता श्वासाद्वारे घेता येणार इन्सुलिन

किचनच्या फरशीवर असणारे हट्टी डाग चुटकीसरशी काढा

Maagh Pornima 2026: माघ पौर्णिमेला करा हे 5 उपाय; पैशाची तंगी होईल कमी

SCROLL FOR NEXT