Devendra Fadnavis News  AI Image
Video

Sinhastha Kumbhmela : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ; कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

Nashik Sinhastha Kumbhamela News : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याला धार्मिक विधींनी सुरुवात झाली. त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा करून धर्मध्वजारोहण करण्यात आले.

Alisha Khedekar

नाशिकमध्ये आजपासून सिंहस्थ कुंभमेळ्याला धार्मिक विधींनी सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर धर्मध्वजारोहण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा करून धर्मध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याला देशभरातील साधू-संत, महंत आणि आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शुभारंभानिमित्त कुशावर्त तीर्थावर विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुशावर्त तीर्थावर पूजा केली. कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर विधिवत धर्मध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

या धार्मिक सोहळ्याला दहा आखाड्यांचे साधू-संत आणि महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यातील आठ मंत्री यांच्यासह अनेक राजकीय आणि प्रशासकीय मान्यवरांनी उपस्थिती लावली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यातील आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर

Cancer Risk Facts : करपलेली रोटी किंवा ब्रेड खाल्ल्यानं खरंच कॅन्सरचा धोका वाढतो? माहित असायलाच हव्यात 'या' ५ गोष्टी

Eye Care: डोळ्यांखालची काळी वर्तुळं कायमची गायब होतील; हे १५ घरगुती उपाय एकदा करूनच बघा

Health Care : पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागते? शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर किती पाणी प्यावे?

RBI Plastic Notes : खिशातील १० आणि २० रुपयांच्या नोटा बदलणार? RBI चा मोठा प्लान समोर

SCROLL FOR NEXT