Nashik News Saam Tv News
Video

Video: गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसर पाण्याखाली

गोदावरीला आलेल्या पुरामुळे रामकुंडाचा परिसर पाण्याखाली गेलाय. दररोज रामकुंड परिसरात होणाऱ्या पूजा विधींना पुराच्या पाण्याचा फटका बसलाय.

Rachana Bhondave

गंगापूर धरणातून साडेआठ हजार क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्र्यंबकेश्वरमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण 90% पेक्षा जास्त भरलं असून धरणात वेगाने पाण्याची आवक होत असल्यामुळे कालपासून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय. गोदावरीला आलेल्या पुरामुळे रामकुंडाचा परिसर पाण्याखाली गेलाय. दररोज रामकुंड परिसरात होणाऱ्या पूजा विधींना पुराच्या पाण्याचा फटका बसलाय. रात्रभर पडणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे गोदावरीच्या पुराचे पाणी रामकुंडावर येणाऱ्या रस्त्यापर्यंत आलंय. या पुराच्या पाण्यामुळे रस्त्यावर पूजाविधी करण्याची भाविकांवर वेळ आलीये. पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने रामकुंड परिसरातील दुकानं आणि टपऱ्या हलवल्या गेल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: आदेश आला तर मंत्रीपद सोडण्याची तयारी- भरत गोगावले

Ranjangaon : साडेतीन महिन्यांनंतर रांजणगाव महागणपती मंदिर भाविकांसाठी खुले; दर्शनासाठी मोठी गर्दी

लाडक्या लेकीसाठी बनवा सोन्याची चैन, या 5 डिझाईन्स सध्या ट्रेंडमध्ये

Anti Paper Leak Law: सर्वात मोठी बातमी! परीक्षा सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; पेपरफुटीप्रकरणी दोषींना ३ महिन्यांच्या आत होणार शिक्षा

अभिजीत दिपकेंची प्रकृती बिघडली; भेटीगाठी घेत असतानाच घाईघाईनं घरात गेले, तातडीने डॉक्टर पोहोचले

SCROLL FOR NEXT