narayan rane  Saam Tv
Video

Maharashtra Politics: चित्रा वाघच्या पाठीमागे भाजप आणि नारायण राणे उभा आहे, मैदान आणि वेळ सांग... राणेंच अनिल परब यांना ओपन चॅलेंज

Narayan Rane challenges Anil Parab: नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना आव्हान दिले आहे. यावरून मोठा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. गुरुवारी विधानपरिषदेमध्ये भाजप आमदार चित्रा वाघ आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यामध्ये मोठा आरोपांचा राडा झाला होता. यामुळे विधासभेत मोठा गदारोळ निर्माण झाला होता. त्यानंतर खासदार नारायण राणे यांनी ट्विट करून चित्रा वाघ यांची पाठ देखील थोपटली होती. आज त्याच प्रकरणावर नारायन राणे यांनी अनिल परब यांना आव्हान दिले आहे. राणे म्हणाले, अनिल परब आणि आक्रमकता हे समीकरण जमते का? त्यांनी कोणाच्याही कानफाडात मारल्याचे पाहिले आहे का? पेशाने वकील असल्यामुळे ते भाषणे करू शकतात. त्यांनी उगाच बढाया मारू नये, असा टोला राणे यांनी लगवला. चित्रा वाघ तुम्हाला पुरून उरेल. तिच्या मागे पूर्ण भाजप आणि नारायण राणे आहे. तसेच अनिल परब यांनी ठिकाण आणि वेळ सांगावी कोणी नाही आले तर नारायण राणे स्वतः तिथे येईल असे ओपन चॅलेंज नारायण राणे यांनी अनिल परब यांना दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

SCROLL FOR NEXT