नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी गावातल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणसाठीचा झाडावरुन होणाऱ्या जीवघेण्या प्रवासाबाबात साम टीव्ही ने ग्राउंड झिरोवरून वास्तव मांडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवण्याबाबत आज सांगितले होते.
यानंतर आजच शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मयुर वसावे यांच्यासह संपुर्ण पथकाने केलखाडी गावात जावून पाहणी केली आहे. याठिकाणी बांधकाम विभागान सर्व मोजमाप पुर्ण करुन उद्यापासूनच साकव बांधण्यासाठी आराखडा तयार केला आहे. या ठिकाणी स्टील स्ट्रक्चरचा साकव उद्यापासून फेब्रीकेटर मार्फत तयार केला जाणार असुन सीमेंट कामालाही दोनच दिवसात सुरवात करण्याची तयारी बांधकाम विभागाने केली आहे. या स्थळाला पोहचण्यासाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. हीच मोठी अडसर बांधकाम विभागात असून यातून मार्ग काडत तातडीने साकवचे काम पुर्ण केले जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.