nagpur news  saam tv
Video

Nagpur News: नागपूरमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन|VIDEO

Hindu-Muslim Unity: रामनवमीनिमित्त राज्याच्या उपराजधानी नागपूरमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अत्यंत सुंदर दर्शन घडले.

Omkar Sonawane

यंदाही नगपूमध्ये रामनवमी निमित्त भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेला मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती होती. दरवर्षीप्रमाणेच, यंदाही ही यात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली.

काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या यात्रेवर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी नागपूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. विशेष म्हणजे, ज्या परिसरात दंगल झाली होती, त्या भागातूनही ही रामनवमीची रॅली शांततेत आणि सलोख्याने पार पडली.

या रॅलीचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे मुस्लिम बांधवांनी केलेले स्वागत. त्यांनी रॅलीवर फुलांची उधळण करत रामनवमीच्या सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक म्हणून रॅलीत सहभागही नोंदवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT