नाफेडचा कांदा महाराष्ट्रात विकणार नाही, सूत्रांची माहिती. ज्या राज्यात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत, त्याच ठिकाणी नाफेडकडून कांदा विक्री होणार असल्याचं समजतंय. येत्या दोन ते तीन दिवसात नाफेड कांदा विक्रीला सुरुवात करणार असल्याची माहितीये. 2.23 लाख मेट्रिक टन कांद्याची नाफेडकडून खरेदी झालीय. नाशिकसह राज्यातील इतर ठिकाणी कांद्याची खरेदी करण्यात आलीये. नाफेडकडून नाशिक जिल्ह्यातूनच कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली होती. सध्या नाशिकमध्ये कांद्याला चार ते साडेचार हजार रुपये दर मिळत असल्याने कांदा उत्पादकांमध्ये आनंदाच वातावरण आहे. मागील काही दिवसांपासून नाशिकच्या बाजारात नाफेडचा कांदा विक्री केला जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र नाफेडकडून महाराष्ट्रात कांद्याची विक्री होणार नसून देशात जिथं कांद्याचे भाव वाढतील, तिथं नाफेडचा कांदा विक्री केला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.