Akola News SaamTv
Video

Akola News : मविआमध्ये ठाकरे गटाचे बंडखोरीचे संकेत, अकोला पश्चिमची जागा ठाकरे गटाला सोडण्याची मागणी

MVA News : मविआमध्ये अकोला पश्चिमच्या जागेवरून ठिणगी पडली असून ठाकरे गटाकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

Saam Tv

अकोला पश्चिम मतदारसंघाची जागा कॉंग्रेसला देण्यास ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. त्याचबरोबर ही जागा ठाकरे गटाला सुटावी यासाठी आज अकोला पश्चिममधील कार्यकर्त्यांनी आज खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. जर ही जागा कॉंग्रेसला सुटली तर अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत राजेश मिश्रा यांनी दिले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून बंडखोरीचेच संकेत महाविकास आघाडीत देण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्यानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीत नाराज इच्छुक उमेदवारांकडून बंडखोरी केली जात आहे. आता अकोला पश्चिम मतदारसंघातून देखील ठाकरे गटाकडून बंडखोरी होण्याचे चिन्ह दिसत आहेत. ही जागा कॉंग्रेसला सुटणार असल्याने आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाकडून राजेश मिश्रा हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आज अकोला पश्चिममधील कार्यकर्त्यांनी आज खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत ही जागा ठाकरे गटाला सोडण्याची मागणी केली आहे. ही जागा कॉंग्रेसला सुटली तर अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत राजेश मिश्रा यांनी दिले आहेत. त्यामुळे आता यावर महाआघाडी काय भूमिका घेणार हे पाहाणं महत्वाचं ठरेल.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शिवसेना शिंदे ८० जागा लढण्याची शक्यता

Red Pumpkin Benefits: लाल भोपळा खाण्याचे हे आश्चर्यकारक फायदे!

Navneet Rana : 'बच्चू कडू करोडोंचा मालक झाला', नवनीत राणा यांचं वक्तव्य; कडू विरुद्व तायडे सामना रंगणार

Maharashtra Politics : बंडखोरीचा 'बाहुबली' पॅटर्न; पुतण्याचा नांदगावमध्ये बंड, महायुतीच्या उमेदवारानं काकांच्या मतदारसंघातच थोपटले दंड

Nandurbar Congress : राजेंद्र गावितांना उमेदवारीनंतर कॉग्रेसमध्ये अंतर्गत कलह; उमेदवारीसाठी ३ कोटी दिल्याचा उदेसिंग पाडवी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT