पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प पंतप्रधान मोदी यांचे भारताला विकसीत करण्याचं स्वप्न आहे, ते आणि विकासाभिमूख असलेला आजचा अर्थसंकल्प आहे. देशातील १४० जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्ती करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं मोहोळ म्हणालेत. सहकार किंवा सिव्हील एविशन खातं त्यानंतर महाराष्ट्र राज्यासाठी या अर्थसंकल्पात काय देण्यात आलंय याची माहिती मंत्री मोहोळ यांनी दिलीय. आजचा अर्थसंकल्प विकासाकडे वेगाने पाऊल टाकणारा आहे.सहकार खातं, नागरी उड्डाण, महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात चांगली तरतूद करण्यात आलीय. १०० शहरात इंडस्ट्रियल पार्क केले जाणार आहेत. सर्वसामान्य माणसाचा विकास होईल असा अर्थसंकल्प आहे.देशात २०-२५ नवीन विमानतळ येत्या काळात होतील, असं मोहोळ म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.