Bangladeshi Ladki Bahin SaamTv
Video

Ladki Bahin Yojana : भारतात घुसखोरी केलीच, वर लाडकी बहीणही झाली, बांगलादेशी महिलेचा कारनामा | Video

Bangladeshi Women Arrested In Kamathipura : देशात घुसखोरी केलेल्या एका बांगलादेशी महिलेने राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Saam Tv

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ एका बांगलादेशी महिलेने घेतला आहे. मुंबई पोलिसांनी कामाठीपुऱ्यात केलेल्या एका कारवाईनंतर ही माहिती समोर आली आहे. या कारवाईत एका बांगलादेशी महिलेसह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय या प्रकरणात एका एजंटलासुद्धा बेड्या ठोकल्या आहेत.

राज्यात घुसखोरी करून बनावट कागदपत्रांचा वापर करत सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ एका बांगलादेशी महिलेने घेतला असल्याचं उघड झालं आहे. मुंबई पोलिसांनी कामाठीपुरा परिसरात केलेल्या एका कारवाईनंतर चौकशीत ही धक्कादायक माहिती समजली आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी ५ बांगलादेशींना अटक केली आहे. या ५ जणांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. इतकंच नाही तर एजंटकडून बनावट कागदपत्र तयार करून या महिलेने राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील घेतला आहे. मुंबई पोलिसांनी या एजंटला देखील अटक केली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रश्न देशात सगळकडेच उद्भवला आहे. मुंबई, पुणे, कलकत्ता, दिल्लीसारख्या शहरांत हे नागरिक येत आहेत. त्यांना शोधण्याचं काम सुरू आहे. तसंच त्यांना परत त्यांच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT