Mankhurd Local Train Incident: Passenger Falls, Escapes Unhurt as Train Halts in Time on Harbour Line saam tv
Video

Mumbai Local: लोकलमधून प्रवासी पडला अन्...; हार्बरची सेवा विस्कळीत|VIDEO

Mumbai Local Train: मानखुर्द स्थानकाजवळ लोकलमधून एक प्रवासी खाली पडल्याने काही काळासाठी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवानं त्याचा जीव वाचला. दुसरी लोकल वेळेवर थांबली आणि मोठा अनर्थ टळला.

Omkar Sonawane

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबई: हार्बर मार्गावर पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडला. आज मानखुर्द रेल्वे स्टेशनजवळ लोकलमधून एक प्रवासी खाली पडल्याची घटना घडली. सुदैवानं त्या प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचला. अपघातानंतर काही क्षणांतच त्याच मार्गावरून दुसरी लोकल ट्रेन धावून आली होती. त्यामुळे काही वेळासाठी प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, लोकल सुरक्षित अंतरावरच थांबली आणि एक मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे पनवेलकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. रेल्वे प्रशासनाकडून लगेचच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मुंबई लोकलमध्ये अपघातांची मालिका सुरूच असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidden Fort In Pune : पुरंदर तालुक्यात लपलाय १६व्या शतकातील खजिना, 'या' किल्ल्यावर जाताच उलगडेल रोचक इतिहास

Dhurandhar : रहमान डकैत विरुद्ध हमजा अलीचा थरार घरबसल्या पाहा; रणवीर सिंहचा 'धुरंधर ' टीव्हीवर येतोय, कुठे अन् कधी पाहाल?

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिलमध्ये वाढू शकतो महागाई भत्ता, नवीन अपडेट समोर

काय आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Famous Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; अल्झायमरशी झुंज देताना घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT