पुण्यापाठोपाठ आता मुंबई गोळीबाराच्या घटनेने हादरलीय. माहीम परिसरात संध्याकाळी 7.30 सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. शोभा हॉटेल परिसरातील प्रसिद्ध 'पी. सी. जैन ज्वेलर्स' दुकानावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. शोभा हॉटेल परिसरातील प्रसिद्ध 'पी. सी. जैन ज्वेलर्स' या दुकानाच्या दिशेने अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात गोळी लागल्याने दुकानाची काच फुटली. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाहीये.
संध्याकाळी 7.30 च्या सुमारास माहीम येथील शोभा हॉटेल जवळील 'पी. सी. जैन ज्वेलर्स' दुकानाबाहेर गोळीबाराची घटना घडली. दोन जण पल्सर बाईकवरून वांद्रेच्या दिशेने आले. सिग्नलवरून यू टर्न मारून ज्वेलर्स वर गोळीबार करण्यात आला. दोघांनी हेल्मेट घातल्यामुळे अजूनही ओळख पटलेली नाही. गोळीबाराचे कारण अस्पष्ट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.