Mumbai Building Fire  Saam Tv
Video

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! गोरेगावमध्ये ४५ मजली इमारतीला भीषण आग, काही जण अडकल्याची भीती; पाहा VIDEO

Mumbai Building Fire: मुंबईत इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. गोरेगावमध्ये ही घटना घडली. ४५ मजली इमारतीच्या ९ व्या मजल्यावर ही आग लागली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.

Priya More

गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम परिसरातील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. कृष्णा वाटिका रोडवरील डीबी वुड या ४५ मजली इमारतीच्या नवव्या मजल्यावर आग लागली. शुक्रवारी सकाळी ही आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अग्निशमन दलाकडून या आगीला लेव्हल-1 घोषित करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, आग बेडरूममध्ये लागून विजेची वायरिंग, इलेक्ट्रिक इंस्टॉलेशन आणि घरगुती साहित्यापर्यंतच मर्यादित होती. इमारतीतील रहिवाशांना सुरक्षितपणे रिफ्यूज एरिया आणि टेरेसवर हलविण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी ४ फायर इंजिन, ४ जंबो टँकर, अ‍ॅडव्हान्स वॉटर टँकर, टर्न टेबल लॅडर, हाय प्रेशर पंप व इतर बचाव साहित्य तैनात करण्यात आले आहे. मुंबई अग्निशमन दल, पोलिस, वीज वितरण कंपनी आणि बीएमसी कर्मचारी यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराण-अमेरिका युद्ध सहा महिने चालणार? युद्धासाठी इराणचा मास्टरप्लॅन काय?

नाशिकमध्ये 300 कोटींचा भूखंड घोटाळा, 49 बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल

२४ वर्षीय क्रिकेटपटूने अचानक घेतली निवृत्ती; राजकीय नेत्यांवर केले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, क्रीडा वर्तुळात खळबळ

उद्धव ठाकरेंची आमदारकी धोक्यात? राजकीय वर्तुळात खळबळ

Malegaon: मालेगावमध्ये तुफान राडा, महिला अन् तरुणांकडून दुकानाची तोडफोड; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT