वांद्रे-वरळी सीलिंक व कोस्टल रोड जोडण्याचं काम पूर्ण झालं असून गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रोडचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अजितदादा अनुपस्थित असल्यानं त्यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना 'महायुतीत कोणतीही फुट पडलेली नाही. सध्या ते दुसऱ्या कार्यक्रमात असल्यानं इथे उपस्थित राहू शकले नाही, मात्र ते दादा प्रवास याच रस्त्याने करतील, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
वांद्रे-वरळी सीलिंक व कोस्टल रोड जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता मरीन ड्राइव्हवरून वांद्रेला अवघ्या 12 मिनिटांत पोहोचता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी या मार्गाचे उद्घाटन केले. या मार्गामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन 70% वेळ व 30% इंधनाची बचत होणार असल्याचा दावा केला जात आहे. या रोडचे उद्घाटन गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती असल्याने माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महायुतीत कोणताही तिढा नाही, अजितदादा दुसऱ्या कार्यक्रमात आहेत आणि याच रोडनं प्रवास करून जाणार आहे, असं फडणवीस यांनी म्हंटल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.