BEST Bus News SaamTv
Video

Mumbai BEST Buses : मुंबईकरांना दिलासा; बेस्टची सेवा पूर्ववत

BEST Employee Strike : दिवाळी बोनस आणि कोविडचा भत्तासह अनेक मागण्यांसाठी आज बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला होता. त्यानंतर बेस्टप्रशासनाने याची दखल घेतल्याने बेस्टची सेवा पूर्ववत झाली आहे.

Saam Tv

दिवाळी बोनस न दिल्याने मुंबईतील बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र आज बेस्ट कर्मचारी कामावर आल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एन दिवाळीत बेस्ट कर्मचाऱ्यांनी रविवारी बेमुदत संपाचा इशारा दिला होता. दिवाळी बोनस आणि कोविडचा भत्ता न मिळाल्याने, त्याचबरोबर इतर मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता. दरवर्षी दिवाळी सुरू होण्यापूर्वीच बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. मात्र यंदा आता दिवाळी संपत आली तरीही बोनस न मिळाल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र बेस्ट प्रशासनाने काल याबाबत पत्रक काढून कोणीही सुट्टी शिवाय किंवा योग्य कारणाशिवाय गैरहजर राहू नये असं सांगितलं होतं. त्यानंतर आज बेस्टचे कर्मचारी कामावर हजर झाल्याने मुंबई बेस्टची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : सरकारी लाडकींना अखेर दणका, 2,289 जणांचा लाभ बंद; आता निलंबन कधी? VIDEO

Melava Teaser: वाघ नेमकी कुणाची शिकार करणार? ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या नव्या टीझरची चर्चा

Diabetes: हाय ब्लड शुगर असल्यास 'या' गोष्टी खाणं टाळा

Maharashtra Politics: मराठीवरून मविआत फूट? ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला दोन्ही काँग्रेसचा दुरावा

Fuel Ban Rules Update : भाजप सरकारचा यू-टर्न; थेट ६२ लाख वाहनधारकांना दिलासा मिळणार

SCROLL FOR NEXT