मुंबई विमानतळावरील एकही विमान नवी मुंबई विमानतळावर हलवणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित करण्याची कोणतीही योजना नाही. दोन्ही विमानतळ स्वतंत्रपणे आणि आपापल्या क्षमतेनुसार कार्यरत राहणार आहेत असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांना पाठवले. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-१ पुनर्विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी पर्यायी प्रस्ताव दिला. आधी टर्मिनल-१B उभारणार, त्यानंतर १A वरील उड्डाणे १B मध्ये हलवण्याची सूचना दिली.
जुने टर्मिनल-१A पाडून पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई विमानतळावरील १४ आंतरराष्ट्रीय शहरांची उड्डाणे नवी मुंबईत हलवण्याची योजना होती. बहरीन, दोहा, जेद्दा, काठमांडू, कुवेत, मस्कत आणि रियाधसह १४ शहरांचा समावेश आहे. विमान कंपन्यांकडूनही उड्डाणे स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला विरोध आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे मुंबई विमानतळावरील उड्डाणे स्थलांतराच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.