Wadala Accident Video News  Saam Tv
Video

Accident : वडाळ्यात भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू

Mumbai Wadala Accident News : मुंबईतील वडाळा पूर्वेकडील गणेश नगर सिग्नल परिसरात ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू.

Alisha Khedekar

मुंबईतील वडाळा पूर्वेकडील गणेश नगर सिग्नल परिसरात रात्री भीषण अपघात घडला. ट्रकखाली चिरडून एका महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बीपीटीचा रस्ता बंद असल्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक वळवण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. परिणामी, परिसरात वाहतुकीचा ताण वाढला असून अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.

महिलेच्या मृत्यूच्या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून वाहतूक रोखली. यावेळी नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करत परिसरातील वाहतूक सुरक्षित करण्याची मागणी केली. तसेच, वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत मिळणार? कृषीमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai News: मुंबई हादरली! बाथरूमध्ये आढळला डॉक्टरचा मृतदेह, सायन रुग्णालयालयात नेमकं काय घडलं?

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर या 7 गोष्टी लक्षात ठेवा; तुमच्यावर कधीही वाईट वेळ येणार नाही

PANEER VS SOYA CHUNKS : शाकाहारी आहारासाठी प्रोटीनचा कोणता स्रोत आहे अधिक चांगला?

SCROLL FOR NEXT