MPSC औषध निरीक्षक पदाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने मुख्य आरोपी मयूर ठाकरे याला अखेर अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासानुसार, विद्यार्थिनीला परीक्षेचा पेपर मिळवून देण्यासाठी झालेल्या 12 लाख रुपयांच्या कथित व्यवहारात मयूर ठाकरे हा महत्त्वाचा दुवा असल्याचं समोर आलं आहे. नंदुरबारमध्ये आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचं नाव या प्रकरणात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील 6 आरोपी हे एकट्या नंदूरबारमधील आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.