Sanjay Raut News SaamTv
Video

VIDEO : लपवाछपवी करत 'मी नाही त्यातले कडी लाव आतली' का करता?, भुजबळांच्या दाव्यावर राऊतांची मोठी प्रतिक्रिया

Sanjay Raut News : भुजबळ काय म्हणत आहेत त्याला आता काही अर्थ नाही, असं म्हंट संजय राऊत यांनी भुजबळ यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देत टीका केली आहे.

Saam Tv

'भुजबळ काय म्हणत आहेत किंवा प्रफुल पटेल काय म्हणत आहेत, प्रताप सरनाईक काय म्हणत आहेत, भावना गवळी काय म्हणत आहेत त्याला आता काही अर्थ नाही. प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता म्हणून त्यांनी आपापल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्या ईडी संदर्भातील दाव्यावरून केली आहे.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी '२०२४ द एलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया' या पुस्तकात अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी 'मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर गेलो. माझ्यासाठी ईडीपासून मुक्ती म्हणजे पुनर्जन्म आहे,' असा खळबळजनक दावा केला आहे. मात्र आता त्यांनी मी अशी कोणतीच मुलाखत दिलेली नाही, असं म्हणत या पुस्तकातील सर्व दावे फेटाळले आहेत. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकरणावर शुक्रवारी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'आता ते काय म्हणतात याला अर्थ नाही. पक्ष सोडून गेलेले सगळे हे ईडीपासून वाचण्यासाठी भाजपसोबत गेले आहेत. स्वतःच्या कातडी आणि प्रॉपर्टी वाचवण्यासाठी त्यांनी आपापल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ते तिकडे गेल्यानंतर लगेच त्यांच्या ईडी कारवाईच्या फाइल कपाटात बंद झाल्या नसत्या. हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील या सगळ्यांच पलायन हे ईडीला घाबरून झालं आहे. मुलुंडचे पोपटलाल सर्वांना तुरुंगात टाकणार होते. मात्र अचानक तयांचा आवाज कसा बंद झाला? आता लपवाछपवी करून 'मी नाही त्यातले कडी लाव आतली' असं करण्याला अर्थ नाही', अशी टीका राऊत यांनी केली आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: केव्हा, कुठे रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका पहिला टी-२० सामना? इथे पाहा फुकटात

Maharashtra News Live Updates: बीडमध्ये भाजपला मोठा धक्का; माजी महिला आमदाराचा शरद पवार गटात प्रवेश

CM Eknath Shinde News : उद्धव ठाकरेंची यांची मशाल घराघरांत आग लावणारी; एकनाथ शिंदे यांचा धाराशिवातून घणाघात

Amit Shah : राहुल गांधींची चौथी पीढी आली तरी...; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगलीतून काय इशारा दिला?

Today Horoscope: कामाच्या ठिकाणी होतील वाद, तर काहींचे परदेशी दौरे होतील पक्के; वाचा तुमच्या राशीत काय?

SCROLL FOR NEXT